माध्यमिक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती बाबत शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट निर्देश द्यावेत

माध्यमिक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती बाबत शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट निर्देश द्यावेत

शिक्षक भारती,कास्ट्राईब व शिक्षकेतर जिल्हा संघटनेची जिल्हाधिकारी व शिक्षणाधिका-यांकडे मागणी

तळेरे

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या”ब्रेक द चेन “अंतर्गत शाळा बंद असताना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शाळेतील उपस्थिती बाबत शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय वेतुरेकर,कास्ट्राईब शिक्षक संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रसाद पडते यांच्यावतीने आज निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे व माधयमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडुस यांची भेट घेऊन स्पष्ट निर्देश देण्याची मागणी संजय वेतुरेकर व संदीप कदम यांनी केली आहे.

माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 50% उपस्थिणीबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेतली असता याबाबत योग्य ती सुचना, निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी यांनी दिले असून, त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गयांची भेट घेतली असता त्यांनी आज संध्याकाळी 5 वाजे पर्यंत पर्यंत उपस्थितीबाबत स्पष्ट निर्देशबाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री संजय वेतुरेकर आणि कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. आशोक कडूस यांनी दिले आहेत. अशी माहिती या तीनही संघटनेच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

 

सिंधुदुर्गनगरी: शिक्षक भारती सिंधुदुर्ग, कास्ट्राईब शिक्षक संघटना व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा संघटनांच्यावतीने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपस्थितींबाबत स्पष्ट निर्देश देण्याची मागणी पत्र देताना संजय वेतुरेकर व संदीप कदम

प्रतिक्रिया व्यक्त करा