You are currently viewing डेगवे-आंबेखणवाडी ग्रामस्थातर्फे जेष्ठांचा सत्कार संपन्न.

डेगवे-आंबेखणवाडी ग्रामस्थातर्फे जेष्ठांचा सत्कार संपन्न.

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात आंबेखणवाडी येथे ” श्री ब्राह्मणी स्थळ” आहे.या ब्राह्मणी स्थळात विविध धार्मिक कार्यक्रम ग्रामस्थ साजरे करतात.
डेगवे आंबेखणवाडी डिगंणे रस्त्यावर असलेल्या ;व ४८ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री स्थापेश्वर मंदिरा जवळून डेगवे गावच्या श्री ईश्वटी देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे ब्राह्मणी स्थळ आहे.आंबेखणवाडीच्या मध्यवर्ती असलेल्या या ठिकाणी ग्रामस्थ प्रतिवर्षी ब्राह्मण भोजन,सत्यनारायणाची महापूजा,श्रावणी सोमवारचे व्रत करणे,देवतावर अभिषेक करणे,गौरी चा कार्यक्रम करणे शिवाय विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करतात.
या ठिकाणी श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र आहे .त्यामुळे उल्हास देसाई यांनी १९८७ मध्ये मुंबईस्थित व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथे “सार्वजनिक तुळशीवृंदावन” बांधून घेतले आहे.

या ठिकाणी नित्यनेमाने पुजा केली जाते.त्यामुळे या ठिकाणचा जिर्णोध्दार करण्यासाठी उल्हास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ बांधवांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये संकल्प सोडला. त्या करीता स्थानिक ग्रामस्थ, भाविक, माहेरवाशीणी, हितचिंतकांनी भरीव देणग्या दिल्या. त्यामुळे या स्थळात पत्राशेड ,कंपाउंड,जलकुंभ,तीर्थक्षेत्र कुंभ व प्रवेशद्वार बांधून घेतले आहे. त्या निमित्ताने “ब्राह्मण भोजन व अभिषेक” करण्यात आला.

यावेळी डेगवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा जेष्ठ ग्रामस्थ श्री. नागबा डेमा देसाई व अंकुश रामचंद्र देसाई, यांनी आपल्या वयाची ९० वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांचा शाल,श्रीफळ,व पुष्पहार देऊन विशेष सत्कार या वाडीतील प्रमुख भाने गंवस,देसाई घराण्याचे जेष्ठ वंशजाचे ५ वे जेष्ठ वंशज व डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री उल्हास देसाई यांच्या शुभ हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन सत्कार केला.

यावेळी सदर ठिकाणी नित्य नेमाने पुजा करणारे सेवक श्री वामन देसाई,यांचाही सत्कार केला. यावेळी उपस्थित जेष्ठ ग्रामस्थ असलेले व माजी सैनिक श्री मोहन देसाई,व राजाराम देसाई यांना पुष्पहार देऊन सन्मानित केले.
या वेळी डेगवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगलदास देसाई,माजी सदस्य शामसुंदर देसाई,ग्रामपंचायत सदस्या वैशाली देसाई,सदानंद देसाई,अमृत देसाई,गोपाळ देसाई, अत्माराम देसाई,लक्ष्मण देसाई,विनय देसाई,अर्जुन मांजरेकर, बाबली देसाई, सुर्याजी देसाई वैगेरे ग्रामस्थ उपस्थित होते. देणगी देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे भाविकांचे,हितचिंतकांचे आभार उल्हास देसाई यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 4 =