You are currently viewing बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आजोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आजोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा

बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने शिवमहोत्सव कार्यक्रमातर्गंत बांदा गाव मर्यादित आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. या स्पर्धत २१४ विद्यार्थी सहभागी झाले होते.


अॅड विठ्ठल परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष तेजस परब ,सचिव अनुज बांदेकर ,बांदा शाळेच्या पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,चित्रकार राहूल परब,विरेंद्र मांजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्यामध्ये बालवयातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची रूजवणूक होणेसाठी संस्थेच्या वतीने चित्रकला, वक्तृत्व ,रांगोळी,वेशभूषा,पोवाडागायन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.चित्रकला स्पर्धेत पहिली ते चौथीच्या गटात ११४,पाचवी ते आठवीच्या गटात ९१ व खुल्या गटात९विदयार्थी सहभागी झाले होते.


या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भुषण सावंत यांनी केले प्रास्ताविक जे.डी.पाटील तर आभार महादेव धुरी यांनी केले.
कार्यक्रत यशस्वी पार पाडण्यासाठी संतोष मांजिलकर ,लक्ष्मण कळंगुटकर ,नारायण बांदेकर, प्रथमेश राणे, जयेश म्हाडगुत, रणजित बांदेकर, केदार कणबर्गी, अजय आरोसकर ,सोनू बांदेकर, लक्ष्मण घोगळे, अमोल माळवदे,संकेत वेंगुर्लेकर, अक्षय मयेकर व स्वयंसेवक दीक्षा गवस,तृप्ती गवस,सिध्दांत नाटेकर यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा