You are currently viewing वजराट गावठणवाडी येथे गणेश घाटचे शर्वाणी गावकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

वजराट गावठणवाडी येथे गणेश घाटचे शर्वाणी गावकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

वेंगुर्ला

तालुक्यातील वजराट गावठणवाडी येथे मंजूर गणेश घाटचे भूमिपूजन जिल्हा परिषद महिला व बाल विकास समिती सभापती शर्वाणी गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी सभापती सौ गावकर यांनी १५ वा वित्त आयोग स्वतःच्या शेष अनुदानातून या गणेश घाट साठी निधी दिल्याबद्दल येथील ग्रामस्थांच्या वतीने येथील खादी उद्योजक व जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर भोसले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडी भाजप तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, सरपंच महेश राणे, उपसरपंच नितीन परब, सदस्य विजय नळेकर, वजराट सोसायटी चेअरमन बाबुराव परब, तालुका चिटणीस नितीन चव्हाण, वामन भोसले, माजी सरपंच सूर्यकांत परब, विकास चव्हाण, विजय पेडणेकर, मंगेश परब, वसंत परब, सुर्या घोने, जयसिंग देसाई, सखाराम पेडणेकर यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 3 =