You are currently viewing खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या वतीने शिरवल येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या वतीने शिरवल येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा उपक्रम,५० लाखापर्यंत कर्ज सुविधा

कणकवली

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या,खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या वतीने, लक्षपूर्ती वेल्फेअर फेडरेशन आणि गजानन नाईक बहुउद्देशीय केंद्र आगर रोड,डहाणू याच्या सहयोगाने कणकवली तालुक्यातील शिरवल ग्रामपंचायत मध्ये स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण आणि जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता या शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते शंकर पार्सेकर यांनी केलेले आहे. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून स्वयंरोजगाराचे होतकरू लोकांना मार्गदर्शन व्हावे आणि गावोगावी उद्योजक घडावेत यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख आणि सेवा क्षेत्रासाठी वीस लाखापर्यंतचे कर्ज दिले जात आहे या कर्जांवर ३५ टक्के पर्यंत अनुदान दिले जात आहे.अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा नोंदणीकृत असलेल्या सोसायटीला आणि सहकारी संस्थांना किंवा रजिस्टर कंपन्यांना ही योजना लागू होत असल्याने त्याचा फायदा प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन शिरवळ सरपंच गौरी वंजारे उपसरपंच प्रवीण तांबे यांनी केले आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि आयोजक शंकर पार्सेकर यांच्याशी ९४२२८७५९०८ या फोनवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =