रेल्वेचा भीषण अपघात, आता पर्यंत ५० जणांचा मृत्यू

रेल्वेचा भीषण अपघात, आता पर्यंत ५० जणांचा मृत्यू

 

दोन ट्रेनची समोरासमोर भीषण धडक झाल्याने तब्बल ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत. सिंध प्रांतातील डहारकीजवळ ही भीषण दुर्घटना घडली. मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्स्प्रेस या दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर आल्याने त्यांची भीषण धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अनेक लोक अजूनही रेल्वे बोगीत अडकले आहेत.

मिल्लत एक्स्प्रेस अनियंत्रित झाल्याने तिचे डबे दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर गेले. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरुन सय्यद एक्स्प्रेस जात होती. त्यावेळी ही भीषण धडक झाली. या अपघातात मिल्लत एक्स्प्रेसचे ८ आणि सय्यद एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे ट्रॅकवरुन उतरले. या अपघातात जवळपास ५० प्रवासी गंभीर जखमी आहेत.

मिल्लत एक्स्प्रेस कराचीवरुन सरगोधाला तर सय्यद एक्स्प्रेस रावळपिंडीवरुन कराचीला जात होती. त्यादरम्यान पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी हा अपघात झाला.

दरम्यान, या अपघाताच्या तब्बल चार तास उलटूनही पाकिस्तानी अधिकारी घटनास्थळी पोहोचलेच नाही. त्यामुळे मदत आणि बचावकार्यही सुरु झालं नसल्याने, अनेक जखमी प्रवाशांचा तडफडून मृत्यू झाला.

अनेक प्रवासी असे काही अडकले आहेत की ट्रेनचे डबे कापून त्यांना बाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही. जे प्रवासी जखमी आहेत, त्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा