You are currently viewing अंशकालीन स्त्री परिचरांचे फिरती बंद आंदोलन सुरु

अंशकालीन स्त्री परिचरांचे फिरती बंद आंदोलन सुरु

मानधन थकित राहिल्याने निर्णय

ओरोस

अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेने ५ जुलै पासून फिरती बंद आंदोलन सुरु केले आहे. कोरोनामुळे नियोजीत आक्रोश मोर्चा स्थगित करीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी यादव यानी दिली. थकित मानधन मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन सीईओ नायर यांना देण्यात आले आहे. अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी यांच्यावर झालेल्या, होत असलेल्या अन्यायाविरुद्ध ५ जुलै २०२१ रोजी आक्रोश मोर्चा काढायचा निर्णय घेतला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व पोलिस अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सध्या कोरोना महामारीमुळे‌, लॉकडाऊनची आचारसंहिता लागू आहे.

प्रशासकीय यंत्रणेकडून माझ्या भगिनी वर गुन्हे दाखल करण्याची वाट पाहत आहेत. त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. मोर्चा स्थगित करुन जोपर्यंत थकित मानधन बँक खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत फिरती बंद करून उपकेंद्रात फक्त हजेरी लावली जाईल. जर आरोग्य सेविकांनी हजेरी लावली नाही तर त्यांच्या विरोधात आंदोलन ही करु परंतू असे आमच्या आरोग्य सेविका करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. स्त्री परिचर कर्मचारी संघटनेने सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना देण्यात आले आहे. यावेळी सीईओ नायर यांना कुडाळ, वेंगुर्ले, वैभववाडी, देवगड गटातून दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. मानधन अनुदान तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. वास्तविक सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व पगार बीले ही गटविकास अधिकाऱ्यांना अर्थशाखेत दिली जातात. या स्तरावर पास करून वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या यादीनुसार बँक खात्यात जमा केले जातात. त्यात तालुका आरोग्य अधिकारी यांचा काडीचा संबंध नाही, असे अतिरिक्त महासचिव रावजी यादव यांनी पटवून दिले. अशी चुकीची माहिती नविन सीईओ ना देणा-यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच उर्वरित मागण्या १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत मंजूर करण्यात आल्या नाहीत. तर १५ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, स्त्री परिचर कर्मचारी जिल्हाध्यक्ष मनिषा मोहन परब, खजिनदार शितल सावंत, जिल्हा सहसचिव वैशाली नारायण केसरकर, मेघा गोसावी, सुगंधा कदम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − seven =