You are currently viewing सांगेली शाळा नं. १ च्या इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव भारत सरकारकडे सादर – ॲड. गुरुनाथ आईर

सांगेली शाळा नं. १ च्या इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव भारत सरकारकडे सादर – ॲड. गुरुनाथ आईर

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती मागणी…

सावंतवाडी

सांगेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ च्या इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव भारत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. अशी माहिती काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष गुरुनाथ आईर यांनी दिली आहे. संबंधीत प्रशालेच्या इमारत दुरुस्ती व भौतिक सुविधांसाठी विशेष निधी देण्याची मागणी श्री.आईर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शिक्षण परिषद, मुंबई यांनी संबंधित शाळेबाबतचा प्रस्ताव समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०२२/२३ अंतर्गत तयार केला आहे. याबाबत महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या उपसंचालकांकडून श्री. आईर यांना लेखी पत्र मिळाल्यानंतर त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 9 =