सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत बैठक…

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत बैठक…

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नव्हती. अशा काही गावातील तक्रारी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, पिंगुळकर मॅडम शेवडे मॅडम तसेच इन्सुली, पाडलोस, ओटवणे ओवळीये, भोमवडी, आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेली ग्रामस्थांनी आपापले प्रश्न मांडले. त्या अनुषंगाने त्या सोडवण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्या शेतकऱ्यांची रक्कम जमा झाली नाही. त्यांची येत्या चार दिवसात जमा केली जाईल, असे सांगितले. तसेच काही गावामध्ये शेती नुकसानीचे चालू वर्षाचे पंचनामे अधिकारीवर्ग करत असताना शेतकऱऱ्यांकडे तातडीने कागदपत्र मागितली जातात ती मागितली जाऊ नयेत अशी सूचनासुद्धा शेतकरी वर्गाने केले ती मान्य करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा