You are currently viewing आयुष्य म्हणजे..

आयुष्य म्हणजे..

आयुष्य म्हणजे..
एक पहाट,
स्वप्नातून जागं करणारी,
एक उजळती वाट.

आयुष्य म्हणजे..
पाखरांचा किलबिलाट,
मंद वाहणाऱ्या,
वाऱ्याचा मोहक सुवास.

आयुष्य म्हणजे..
चिमुकल्यांची,
शाळेसाठी पळापळ,
दोन वेळच्या घासासाठी,
दिवसरात्र आपली धावपळ.

आयुष्य म्हणजे..
एक रम्य संध्याकाळ,
दोन-चार मित्रांसोबत,
कॉलेजच्या कट्ट्यावर,
घालवलेला काळ.

आयुष्य म्हणजे..
जुन्या आठवणींचा जथ्था.
कोणकोणत्या जपाव्यात…
हाच प्रश्न मोठ्ठा…!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =