You are currently viewing एडगांवचे सुपुत्र, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे कक्ष सेवक सुरेश गुरव यांचे कोरोनाने निधन

एडगांवचे सुपुत्र, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे कक्ष सेवक सुरेश गुरव यांचे कोरोनाने निधन

वैभववाडी :

कोरोना काळात दिवस-रात्र रुग्णसेवा देणारे एडगांव गावचे सुपुत्र, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे कक्ष सेवक सुरेश बाळू गुरव वय 57 या कोरोना योध्याचे कोरोनाने मुंबई येथे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने एडगांव वर शोककळा पसरली आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील पो. नि. विश्वनाथ तांबे या एडगांवच्या सुपुत्राचा मुंबई येथे कोरोनाने मृत्यू झाला होता. एडगांव गावाने या संकट काळात दोन योध्दे गमावले आहेत.

पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात श्री सुरेश गुरव हे कक्ष सेवक म्हणून कार्यरत होते. रुग्णालयाचे मॅनेजर आणि मुकादम अशी ओळख पनवेलमध्ये त्यांची होती. कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे काम करणारे ते एक प्रामाणिक सेवक होते.

रुग्णांना ड्रेसिंग करणे, औषध देणे, केसपेपर काढणे, मलेरिया नमुने घेणे आदी कामे ते नित्यनियमाने व कर्तव्य भावनेने करत होते. सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान त्यांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने गुरव यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी गावात समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पनवेल आरोग्य प्रशासनाच्या वतीने नुकताच सुरेश गुरव यांना कोव्हीड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, पुतणे व चार भाऊ असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =