You are currently viewing चतुर्थी सणाच्या तोंडावर निकृष्ट दर्जाचे तांदूळ शासकीय रेशन दुकानामध्ये वितरीत होत असल्याची मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार…

चतुर्थी सणाच्या तोंडावर निकृष्ट दर्जाचे तांदूळ शासकीय रेशन दुकानामध्ये वितरीत होत असल्याची मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार…

पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील शासकीय रेशनदुकानांमध्ये वितरीत होणारा तांदूळ हा निकृष्ट व भेसळ युक्त तसेच तुकड्याचे(कणी)प्रमाण जास्त असणारा आहे.हा भरडी स्वरूपाचा तांदूळ असून यामधील तुकड्याचे(कणी)प्रमाण ६०%पेक्षा जास्त आहे,निकृष्ट व भेसळ स्वरूपाचा तांदूळ जिल्ह्याबाहेरील मिल्समधून पाठवल्याचे निदर्शनास आले आहे.
शासन निर्णयाप्रमाणे २५%पेक्षा तुकडा(कणी)शासकीय वितरीत तांदळा मध्ये असू नये,असे असताना जिल्ह्यातील शासकीय गोदामामध्ये असा तांदूळ का जमा करून घेण्यात आला?
हा तांदूळ चतुर्थी सणाच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण गोरगरीब,कष्टकरी जनतेच्या माथी मारण्यात येणार आहे.फक्त कागदोपत्री २५%अहवाल सादर करून प्रत्यक्षात मात्र ६०%पेक्षा जास्त तुकडा(कणी) या मध्ये असून गुणवत्ता व दर्जा यासोबत तडजोड करून सामान्य,गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावा, तांदळाचे वितरण त्वरित थांबवण्यात यावे,या तक्रारीच्या आधारावर चौकशी समिती नेमण्यात यावी.जिल्ह्यातील गोदामामध्ये जमा तांदुळाची तहसीलदार,तक्रारदार प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष पाहणी करून तुकडा(कणी)याची टक्केवारी तपासणी करून संबधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मनसे मार्फत जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटीमध्ये करण्यात आली. मनसे शिष्टमंडळमध्ये गणेश वाईरकर माजी तालुकाध्यक्ष मालवण,प्रथमेश धुरी,सागर सावंत,रोहित नाईक,दत्ताराम सावंत उपस्थित होते.पत्रकारांशी बोलताना धीरज परब म्हणाले संबंधित विषयाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा निकृष्ट दर्जाच्या तांदूळ गोदामाला ताळे ठोकण्यात येईल.गावचे सरपंच,लोकप्रतिनिधी,सामा8जिक कार्यकर्ते यांनी या निकृष्ट व भेसळयुक्त दर्जाच्या तांदळाचे वितरण गावोगावी रोखावे व गोरगरीब जनतेला न्याय द्यावा तसेच रेशनदुकान धारकांनी असा निकृष्ट दर्जाचा तांदळु स्वीकारु नये,असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा