अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी हरिश्चंद्र पवार यांची अभिनंदनीय निवड

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी हरिश्चंद्र पवार यांची अभिनंदनीय निवड

सावंतवाडी

अ. भा.मराठी पत्रकार परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एस.एम.देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक यांनी नवीन प्रसिध्दी प्रमुखांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..

प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. परिषदेने त्या त्या विभागातले उपाध्यक्ष, विभागीय सचिवांनी जिल्हाध्यक्षांशी  चर्चा करून नावांची शिफारस परिषदेकडे करायची होती. परिषदेकडे आलेल्या नावांबद्दल विचार करून योग्य निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकणातील बहुतेक जिल्हयातील प्रसिध्दी प्रमुखांची नावे परिषदेकडे आली असून परिषदेने ही नावे निश्चित केली आहेत. यात सिधुंदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी हरिश्‍चंद्र चंद्रकांत पवार,  सावंतवाडी, रत्नागिरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी जमीर खलपे, रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी कमलेश ठाकूर,  पेण, आणि पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी विजय माणिक घरत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे

मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी या नियुक्तया आज जाहीर केल्या आहेत.. सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्हयातील नवीन प्रसिध्दी प्रमुख पदाच्या या नियुक्त्या एक वर्षांसाठी असतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा