You are currently viewing प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा दारिद्र्य रेषेखाली असलेल्या मच्छिमार कुटुंबीयांनी लाभ घ्यावा…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा दारिद्र्य रेषेखाली असलेल्या मच्छिमार कुटुंबीयांनी लाभ घ्यावा…

बाबा मोंडकर, जिल्हा प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात असून पावसाळी हंगामातील मच्छीमारी बंद कालावधीसाठी प्रत्येक मच्छिमार सदस्याला३०००/- रुपये आर्थिक अनुदान मत्स्यविभागाकडून दिले जाणार आहे यांसाठी
बँक पासबुक,आधार कार्ड, रेशनकार्ड प्रत्येकी ६ झेरॉक्स व ग्रामपंचायतीकडील दारीद्र्यरेषेखालील दाखला, सोसायटीकडील क्रियाशिल मच्छिमार असल्याचा दाखला प्रत्येकी १ मुळ प्रत त्याच्या ५ झेरॉक्स.अशाप्रकारे ६ बंच करुन परिपूर्ण प्रस्ताव मच्छीमार व्यवसायिकांनी ज्या मच्छीमार संस्थेत सभासद आहेत त्या संस्थेत सादर करायचे असून सदर प्रस्ताव संस्थेमार्फत मत्स्यविभाग कार्यालयात दाखल केले जाणार असून शासनस्तरावर सर्व कागदपत्राची तपासणी होऊन पात्र मच्छीमार व्यावसायिकांस शासनाच्या मच्छीमारीबंदी कालावधीमध्ये ३००० रुपए सानूग्रह अनुदान दरवर्षी दिले जाणार आहे. एकाच कुटुंबातील १८ ते ६० वयोगटातील सर्वांचे प्रस्ताव स्वीकारले जातील परंतु आता स्वीकारलेल्या प्रस्ताव अनुदान हे चालू मासेमारी बंदी कालावधी साठी मिळणारे नसून पुढील वर्षाच्या मासेमारी बंदी कालावधी पासून सुरू होणार आहे यांची नोंद मच्छीमारासाठी नोंद घ्यावी. सदर योजनेचा जास्तीत जास्त मच्छीमार बांधवांनी लाभ घ्यावा अशी विनंती श्री बाबा मोंडकर,जिल्हा प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 2 =