शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये येथे वह्या व छत्र्यांचे वाटप आणि गुणवंतांचा गुणगौरव समारंभ सपन्न.
बांदा
श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये येथे १६ जून २०२५ रोजी शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून इंडिया प्रोटेक्टीव्ह पेन्ट व माऊली ग्रामविकास मंडळ यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वह्या व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मेहनतीने शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे संस्थापक मा. श्री एम. डी. सावंत सर, इंडिया प्रोटेक्टीव्ह पेन्टचे मॅनेजर मा. श्री यशवंतजी सावंत, भाजपाचे बांदा मंडल क्रिडा संयोजक मा.श्री. गुरु कल्याणकर,माऊली ग्रामविकास मंडळाचे सचिव मा. श्री उमेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत,आरोग्य अधिकारी मा.श्री.माणगावकर,आरोग्य सेवक मा.श्री. संतोष पारधी,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण सावंत, पोलिस पाटील मा. श्री कोळापटे व पत्रकार दत्ता पोकळे, शरद सावंत,दशरथ सावंत, आदी मान्यवर तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सावंत मॅडम यांनी केले, सूत्रसंचालन श्री परेश देसाई सर यांनी केले, तर आभार श्री राठोड सर यांनी मानले.
——————————————–
विद्यार्थांनी शिकून चांगली नोकरी धंदा करून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे. त्याचबरोबर आपण शिकलेले विद्येचे मंदिर व आपले गाव कसे विकसित होईल यासाठी देखील योगदान द्यावे – गुरु कल्याणकर, भाजप बांदा मंडल क्रीडा संयोजक