You are currently viewing नानिवडे-एकविरा विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सीमा नानिवडेकर बिनविरोध…

नानिवडे-एकविरा विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सीमा नानिवडेकर बिनविरोध…

वैभववाडी

नानिवडे येथील श्री. एकविरा विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाच्या सीमा नानिवडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आले आहे. सलग पाचव्यांदा सौ. नानिवडेकर यांची चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. बुधवार दि.१२ जानेवारी रोजी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. उपस्थित संचालक व स्थानिक ग्रामस्थ यांनी चेअरमन पदासाठी सौ.सीमा शरदचंद्र नानिवडेकर यांची निवड केली. तसेच व्हा. चेअरमन पदी श्री. तुकाराम तानु आग्रे यांची निवड झाली आहे. या निवडणूक प्रसंगी अध्यासी अधिकारी म्हणून सौ. सुनिता भोगले तसेच संस्थेचे सचिव श्री. संतोष गणपत हांदे यांनी काम पाहिले. यावेळी श्री. मनोहर नारायण महाजन, तुकाराम बाबाजी गावडे, उदय शरद नानिवडेकर, प्रकाश शंकर खाडये, फैय्याज अबुबकर सांरग, आत्माराम पांडुरंग खाडये, सुभाष शंकर खाडये, सुकेशनी सिताराम शिवगन, सिताराम लक्ष्मण कातकर व सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते. नूतन चेअरमन सौ. नानिवडेकर म्हणाल्या, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ही संस्था यापुढेही कार्यरत राहील. गावातील सुशिक्षित बेरोजगार तसेच युवा उद्योजक उद्योजकांच्या पाठीशी संस्था कायम राहिल. असे सांगितले. सोसायटीची निवडणूक बिनविरोध व पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा