You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी जत्रोत्सवानंतर केली मंदिर परिसराची स्वच्छता

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी जत्रोत्सवानंतर केली मंदिर परिसराची स्वच्छता

*बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी जत्रोत्सवानंतर केली मंदिर परिसराची स्वच्छता*

*स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत राबवले स्वच्छता अभियान*

*बांदा*

जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेतील स्काऊट- गाईड व कब- बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता अभियान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
बांदा गावाचे आराध्य ग्रामदैवत बांदेश्वर -भुमिका हिच्या जत्रोत्सवानंतर मंदिर परिसराची साफसफाई करून परिसर चकाचक करण्यात आला.बांदा येथील जत्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो.हा कचरा बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित करून बांदा ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी यांच्या मदतीने या करण्याची विल्हेवाट लावली.
शाळेने राबविलेल्या या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना देवस्थान कमिटीच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.तसेच देवस्थान कमिटीच्या वतीने या स्वच्छता अभियानात सहभागी विद्यार्थ्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.स्वच्छ भारत या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी विद्यार्थ्यांना केलेल्या या स्वच्छतेबद्दल‌ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळू सावंत व सदस्य यांनी धन्यवाद दिले. स्काऊट गाईडचे विद्यार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =