You are currently viewing कणकवली तालुक्यातील रुग्णवाहिका चालकांना सभापती रावराणे यांनी दिले विमा संरक्षण

कणकवली तालुक्यातील रुग्णवाहिका चालकांना सभापती रावराणे यांनी दिले विमा संरक्षण

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला उपक्रम

आम. राणे यांच्या हस्ते केले विमा सर्टिफिकेटचे वितरण

कणकवली
आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी कणकवली तालूक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील व उपजिल्हा रूग्णालयातील २ असे एकूण ९ रूग्णवाहीकांवरील वाहन चालकांना विमा संरक्षण दिले.या विम्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण आम.नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आला.

दरम्यान, विमा संरक्षण सभापती मनोज रावराणे यांनी स्व:खर्चाने केलेले असून त्यामुळे कणकवली तालूक्यातील रुग्णवाहिका वाहन चालकांना यांचा लाभ मिळाला आहे. त्याबद्दल चालकांनी समाधान व्यक्त केले. कणकवली येथील आम. नितेश राणे यांच्या हस्ते ओम गणेश निवासस्थानी आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात सदर रुग्णवाहिका चालकांना विम्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, भाजपा ग्रामीण मंडळ कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत,माजी उपसभापती महेश गुरव, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, बापू सावंत व अन्य उपस्थित होते.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने कोरोनामध्ये प्राधान्यान काम करणाऱ्यासाठी सुरक्षा कवच म्हणून विमा योजना सुरु करण्याचे आदेश दिले. परंतु, या कोरोनाच्या महामारीमध्ये प्रामुख्याने रुग्णांची जवळून सेवा बजावणाऱ्या रुग्णवाहीकांच्या वाहन चालकांकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. मात्र, प्रथमच जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. रूग्णवाहीकेवरील वाहन चालक आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावीत असतो, आणि हा घटक कुठेतरी दुलक्षीत राहू नये व त्यांना भविष्यामध्ये विमा योजनेचा त्याला आधार असावा याच भावनेने सभापती मनोज रावराणे यांनी हा विमा काढलेला आहे.

यावेळी रुग्णवाहिका चालक मारुती जोशी, निलेश राणे, योगेश सुतार, अजित सापळे, प्रविण चव्हाण, निलेश चिंदरकर, व्हा.एम.मोचेमांडकर, डी. बी.पांचाळ, श्री.गजोबार आदींना कोरोना काळातील विमा कवच आम.नितेश राणे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 8 =