You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

🔸 रेडी माऊली मंदिर विश्वस्तांनी मानले भाजपाचे आभार .

🔸जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ यांचा पाठपुरावा .

पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ – २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३० .५१ लक्ष येवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देवुन १०८१५.१९ लक्ष एवढा निधी सन २०२२ – २३ मध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता दिली आहे .
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८.९६ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून , वेंगुर्ले तालुक्यातील रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी , तसेच रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे यासाठी २.५० कोटी अशापद्धतीने ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे .
राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सदर कामांना मंजुरी दिली , तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सदर कामांना पक्षाच्या वतीने शिफारस दिली व पाठपुरावा केला याबद्दल भाजपा पक्षाचे आभार मानण्यासाठी माऊली मंदिराचे विश्वस्त व मानकरी यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देऊन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले .
यावेळी रेडी माऊली मंदिराचे विश्वस्त

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − seven =