You are currently viewing सखाराम देसाई यांची पोलीस सब इन्स्पेक्टर पदी नियुक्ती

सखाराम देसाई यांची पोलीस सब इन्स्पेक्टर पदी नियुक्ती

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे कार्यकर्ते श्री सखाराम श्रीधर देसाई यांना नुकतीच मुंबईच्या पोलीस विभागात ” सब.इन्स्पेक्टर ” पदी बढती मिळाली आहे.त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री षसखाराम तथा बाळा देसाई यांची पोलीस दलात प्रथम नियुक्ती सन १९८५ मध्ये झाली.त्यांनी मुंबईत देवनार,नर्कोटिक्स,एम.आरे मार्ग,भोईवाडा, डि.बि.मार्ग,डि.एन.नगर,मंत्रालय,व सद्या डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.
गेल्या ३६ वर्षाच्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीत त्यांनी पोलीस नाईक,पोलीस हवालदार,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर त्यांनी चांगले काम केले आहे.या कार्यकाळात त्यांना एकूण ९७ बक्षिसे देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या घरात पोलीस खात्याची उज्ज्वल परंपरा आहे.त्यांचे आजोबा वं वडीलानी पोलिस दलात” सब इन्स्पेक्टर पदी काम केले आहे.त्यांचा लहान बंधू सुनील देसाई हे सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये सद्या कार्यरत आहेत.
त्यांच्या बढती बध्दल डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे अध्यक्ष तथा विलेपार्ले मतदार संघाचे माजी आमदार गुरूनाथ देसाई व सरचिटणीस उल्हास देसाई यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

 

उल्हास देसाई
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 3 =