‘जिंदगी गुलजार है’ नंतर लवकरच…

‘जिंदगी गुलजार है’ नंतर लवकरच…

प्रेमाला जात, धर्म, पंथं आणि कुठल्याही सीमारेषांचं बंधन नसतं. अशाच एका प्रेमाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची ‘जिंदगी गुलजार है’ ही मालिका सगळ्यांना ठाऊक असेल. या मालिकेला पाकिस्तानातच नाही तर भारतासह इतर अनेक देशात मोठी लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. याच मालिकेच्या लेखिका उमीरा अहमद यांची आणखी एक नवी प्रेमकथा मालिकेच्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

पाकिस्तानी लेखिका उमीरा अहमद यांची ‘धूप की दीवार’ ही मालिका २५ जूनपासून झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतेय. या मालिकेत अभिनेता सजल अली आणि अभिनेत्री अहद रजा मीर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या शोचं पोस्टर आणि ट्रेरल नुकताच रिलीज झाला असून या शोसाठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

या शोमध्ये एका क्रास बॉर्डर लव्ह स्टोरीला म्हणजेच भारत-पाकिस्तानमधील तरुण तरुणीच्या प्रेमकथेला सुंदर रुपात मांडण्यात आलंय. या शोमधून शांती, सुसंवाद आणि जगण्यातील आनंद या गोष्टींचा मिलाप दाखवण्यात आलाय.

या शोमधील अभिनेता सजल अलीने यापूर्वी बॉलिवूडमधली दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ या सिनेमात महत्वाची भूमिका साकारली आहे. तर साराची भुमिका साकारणारी अभिनेत्री मीर हिने ‘सममी’ आणि ‘एहद ए वफा’ या शोंमध्ये काम केल आहे. तर ‘जिंदगी गुलजार है’ या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक हसीब हमन हेच ‘धूप की दीवार’ या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. जाती, धर्माची सगळी बंधन तोडणारी ही प्रेम कहाणी असल्याचं दिग्दर्शक बसीब हमन म्हणाले.

मोशन कंटेट ग्रुप आणि हंमदन फिल्मसने या शोची निर्मिती केली असून. या शोमध्ये सजल अली आणि अहद रजा मीर यांच्यासोबतच समिया मुमताज, जइब रेहेमान, सविरा नदिम, समिना एहमद, मनजार सेहबई, रझा तलीश, अली खान, अदनान जफर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा