You are currently viewing डॉ.राजू पुजारी यांना राज्यस्तरीय लोकरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

डॉ.राजू पुजारी यांना राज्यस्तरीय लोकरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पशु वैद्यकीय डॉ.राजू मनगु पुजारी यांना राज्यस्तरीय लोकरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

डॉ.राजू पुजारी यांनी पशु वैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत राहतानाच विविध माध्यमातून सामाजिक, धार्मिक क्षेत्रात भरीव कार्य सुरु ठेवले आहे.विशेष म्हणजे शेतकऱ्यांमध्ये पशुंच्या विविध आजारांबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल मोफत मार्गदर्शन ,युवकांना संघटित करुन त्या संघटीत ताकदीचा वापर विधायक कार्यासाठी करत त्यांनी वेगळेपण जपले आहे.या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांची वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पशु वैद्यकीय डॉ.राजू पुजारी राज्यस्तरीय लोकरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.या पुरस्काराचे वितरण लवकरच एका शानदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 4 =