You are currently viewing उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती, सिंधुदुर्गचे सुपुत्र सुरेंद्र तावडे यांचा १६ ला सत्कार…

उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती, सिंधुदुर्गचे सुपुत्र सुरेंद्र तावडे यांचा १६ ला सत्कार…

संग्राम देसाईंची संकल्पना; नवोदित वकीलांना होणार सनद वाटप…

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा करिताचे पालक सदस्य ॲड. संग्राम देसाई यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले व उच्च न्यायालय मुंबईचे विद्यमान न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र पंढरीनाथ तावडे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा तसेच वकिली क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या जिल्ह्यातील वकिलांना सनद प्रदान समारंभ दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ओरोस येथे कृषी भवन मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख उपस्थित असणार असल्याची माहिती सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, सचिव ॲड. अमोल मालवणकर, उपाध्यक्ष ॲड. गिरीश गिरकर आणि ॲड. सौ. वेदिका राऊळ, सहसचिव ॲड. यतिश खानोलकर, कोषाध्यक्ष ॲड. प्रकाश बोडस, ॲड. राजीव बिले, ॲड. उमेश सावंत, ॲड. नारायण गोडकर, ॲड. नीलिमा गावडे, ॲड.सम्राट देसाई, ॲड. अभिषेक गोगटे, ॲड. दिलीप ठाकूर, तसेच कार्यकारणी सदस्य सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन तर्फे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 2 =