You are currently viewing निलेश राणे यांचे मालवणात भाजपच्यावतीने जल्लोषी स्वागत

निलेश राणे यांचे मालवणात भाजपच्यावतीने जल्लोषी स्वागत

निलेश राणे यांचे मालवणात भाजपच्यावतीने जल्लोषी स्वागत

मालवण

शहरात दाखल झालेल्या माजी खासदार निलेश राणे यांचे भरड नाक्यावर मालवण भाजपच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. निलेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी राणे यांच्यावर दबाव वाढवला होता. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देत मुंबई गाठली होती. निलेश राणेंचा निर्णय भाजपला परवडणारा नसल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत निलेश राणे यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या चर्चेनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणेंना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर करण्यात भाजपा नेत्यांना यश आले. कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत होता. लोकसभा विधानसभा निवडणुकीबरोबर इतर निवडणुकाही महत्वाच्या आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेणे गरजेचे आहे अशी मागणी राणेंची होती. अखेर कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा शब्द मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला. दोन्ही मोठ्या नेत्यांनी शब्द दिल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर आज मालवणात आलेल्या निलेश राणे यांचे भाजपाने जोरदार स्वागत केले. सायंकाळी भरड नाका येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत निलेश राणे यांचे जंगी स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, के.पी चव्हाण, आबा हडकर, अशोक तोडणकर, सुदेश आचरेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पंकज सादये, ललित चव्हाण, यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा