सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासमोर भाजपाचे लक्षवेधी आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासमोर भाजपाचे लक्षवेधी आंदोलन

पोलिसांनी घेतले भाजपच्या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीना ताब्यात

सिंधुदुर्गनगरी

कोरोनामध्ये जिल्ह्याची स्थिती गंभीर झाल्याने शुक्रवारी भाजपच्या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीनी जिल्हा सामान्य रुग्णालया समोर लक्ष वेध आंदोलन छेडले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह ठाकरें तथा महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला.

अखेर सिंधूदुर्गनगरी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी आम अजित गोगटे, रणजीत देसाई, सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, संजू परब, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्यासह सर्वांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले.

यावेळी सभापती महेंद्र चव्हाण, शर्वाणी गांवकर, अंकुश जाधव, दादा साईल, आनंद शिरवलकर, जेरॉन फर्नांडिस, अविनाश पराडकर, अशोक सावंत, राजू राऊळ, राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, मनोज रावराणे, संतोष कानडे, प्रकाश पारकर, विनायक राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ‘एक दो-एक दो, पालकमंत्री फेक दो’, ‘पार्सल मंत्री गुळगुळीत-जिल्हा झाला मूळमुळीत’, ‘बाजार भरला मयतांचा, खीसा भरला स्वतःचा’, ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा