आमदार वैभव नाईक यांनी पाळला शब्द..

आमदार वैभव नाईक यांनी पाळला शब्द..

हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका

मालवण :

उपतालुका प्रमुख बाबा सावंत, बाबा आंगणे, बंडू चव्हाण, किर्लोस सरपंच बंडू सावंत, हिवाळे सरपंच पुरुषोत्तम खेडेकर, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत, हिवाळे शाखा प्रमुख संजय परब यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून  हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर करून दिली आहे. खनिकर्म विभागाच्या निधीतून हि रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा