You are currently viewing *कोविड काळात सेवा देणाऱ्याआरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या…

*कोविड काळात सेवा देणाऱ्याआरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या…

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन

सावंतवाडी
कोविड संकट काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, परिचारिका व डॉक्टर व टेक्निशियन स्टाफ यांना प्राधान्य देऊन तसेच शासन निर्णय घेऊन अशा कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी आरोग्य रुग्णसेवेत काम करण्याची व कायमस्वरूपी नोकरी देण्याची हमी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिले आहे.
नुकत्याच कोरोना महामारीच्या संसर्गामध्ये राज्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य टेक्निशियन स्टाफ अशा विविध आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना महामारी च्या संसर्गाच्या काळात उत्तम जनसेवा करून वेळप्रसंगी आपल्या कुटुंबावरती येणाऱ्या कठीण प्रसंगाच्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता यांनी काम केले असून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून शासकीय रुग्णालयात काम केले होते.

वेळ प्रसंगी राज्यातील रुग्णांचे प्राण वाचवण्यास सैनिकांप्रमाणे कोरोना योद्धा म्हणून काम केले होते. आणि कोरोना महामारीचा संसर्ग कमी झाल्याने त्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे.
१९७८ सालामध्ये राज्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरकार असताना शासकीय विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा कित्येक दिवस संपावरती गेल्यानंतर त्या काळातील राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी शासकीय कामकाज करून जनतेला दिलासा दिला होता.

तत्कालिन कॉंग्रेस पक्षाच्या सरकारने अशा सुशिक्षित बेरोजगारांना संपात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने त्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन अनेकांना कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी प्राप्त करून दिली होती आणि व तसा शासन निर्णय घेतला होता.

संकटसमयी तात्पुरते घेतलेल्या आरोग्य सेवेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन देऊन तसा शासन निर्णय घेऊन निवृत्त भविष्यात होणारे आरोग्य कर्मचारी व डॉक्टर, परिचारिका हे असे व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर संकट काळात जनसेवा हीच ईश्वर सेवा करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांना, परिचारिका व डॉक्टर व टेक्निशियन स्टाफ यांना प्राधान्य देऊन तसेच शासन निर्णय घेऊन अशा कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी आरोग्य रुग्णसेवेत काम करण्याची व कायमस्वरूपी नोकरी देण्याची हमी देण्यात यावी,

तसेच अशा कर्मचाऱ्यांना व परिचारिकांना व तसेच टेक्निशियन स्टाफला 5000 च्या पुढे बेकारी भत्ता म्हणून व डॉक्टरांना 21 हजार पर्यंत दरमहा मानधन देऊन जोपर्यंत शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळेपर्यंत अशा व्यक्तींना राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन निर्णय घेऊन दिलासा देण्यात यावा.

जेणेकरून भविष्यात तिसरी व चौथी कारोना संसर्गाची लाट किंवा वेगवेगळे आजार पसरल्यास अशा कर्मचाऱ्यांचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी होऊन अनेक कुटुंबीयांचे व तसेच रुग्णांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता येईल अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी आपल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा