You are currently viewing १५ जून व १७ जून रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा…

१५ जून व १७ जून रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा…

सिंधुदूर्ग :

दिनांक १५ जून व १७ जून २०२१ रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी ऑनलाईन सहभागी व्हावे, जिल्ह्यातील उद्योजकांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर ज्या उद्योग अस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा उद्योजकांनी पोर्टलव्दारे आपली नोंदणी करुन रिक्तपदे पोस्ट करावीत.

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये जिल्हयातील उद्योजकांनी  आपली रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. नोकरीची गरज असलेल्या उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना उद्योजक तारीख व वेळ देवून मुलाखत ऑनलाईन घेवून अंतिम निवड करतील किंवा त्यांच्या अटीशर्तीना ग्राह्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवून अंतिम निवड करु शकतील.अधिक माहितीसाठी ०२३६२-२२८८३५, ९४०३३५०६८९ या क्रमांकावर अथवा ईमेल आयडी sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा,असे आवाहन सुनिल पवार,सहाय्य्क आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा