असा मी तसा मी

असा मी तसा मी

खरंच आहे कठीण,
आपल्याबद्दल सांगणं.
मला आवडत माझ्या,
मनासारखं वागणं.

माहीत नाही माझ्यात,
काय आहे चांगुलपणा.
मित्र सखे सोबतींचा,
कधीच नाही कमीपणा.

गरीब श्रीमंत हा कधी,
मी भेदच नाही केला.
हसत खेळत आनंदात,
जगण्याचा देतो मी सल्ला.

स्वभाव तसा थोडा रागीट,
मनात माझ्या प्रेम अपार.
पटत नाही कधी चुकीचं,
निर्णय घेतो आर की पार.

आवडत्यास जीव लावतो,
शेवटपर्यंत नातं जपतो.
दुःख जरी दिले त्याने,
दुःखापेक्षा माणूस राखतो.

कपट कधीच नसतं मनात,
राग कधीच ठेवत नाही.
विसरून राग रुसवा क्षणात,
नात्यांना नात्यात गुंफत राही.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा