You are currently viewing फोंडाघाटात मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी; दोन तास मुसळधार वर्षाव

फोंडाघाटात मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी; दोन तास मुसळधार वर्षाव

फोंडाघाटात मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी; दोन तास मुसळधार वर्षाव

गडगडाटासह कोसळला पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी, वीजपुरवठा खंडित

फोंडाघाट

फोंडाघाट परिसरात शनिवारी दुपारनंतर मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावत सलग दोन तास मुसळधार वर्षाव केला. सकाळपासून कडक ऊन पडले होते. मात्र दुपारी सुमारे २ वाजल्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.
या पावसामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून वातावरण आल्हाददायक बनले आहे. शेतकऱ्यांमध्ये नांगरणी व पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे, अनेक नागरिकांची घरांच्या शाकारणीची कामे अद्याप अपूर्ण असल्याने त्यांची धावपळ उडाली.
दरम्यान, जोरदार गडगडाट व विजांच्या कडकडाटामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवांवरही परिणाम झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विजा पडण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी झाडाखाली उभे राहणे टाळावे तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी फोंडाघाटवासीयांना केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा