You are currently viewing राया उडवू या पतंग

राया उडवू या पतंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लावणी*

 

*राया उडवू या पतंग* ( लावणी )

 

पौषामधलं आभाळ सारं, उतरून आले रंग

अहो राया चला मैदानी,जोडीनं उडवू पतंग

राघू, मैना, पोपट सारे

उडती रानोमाळी

निळ्या, केशरी पतंगासवे

जाती उंच आभाळी

हलक्या हाताने खेचा दोरा, थरथर करतय अंग

अहो राया चला मैदानी, जोडीनं उडवू पतंग

पतंग माझा अवखळ भारी

वरती खाली फिरतो

क्षणात भुईवर येता येता

आभाळामधे शिरतो

नखरे त्याचे मान्य करा हो नका होऊ तुम्ही तंग

अहो राया चला मैदानी, जोडीनं उडवू पतंग

फुलून आलं आभाळ सारं

चमचम करती तारे

आपण दोघा बोलावती

धसमुसळे हे वारे

पतंगासवे उंच आभाळी जाऊ जोडीनं संग

अहो राया चला मैदानी, जोडीनं उडवू पतंग

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

 

*संवाद मिडिया*

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————

जग झपाट्याने बदलत चाललंय…🌐

टेक्नॉलॉजीमध्ये पण निरंतर प्रगती होत आहे..🤗

 

*काळाप्रमाणे आपणही बदलणार की नाही ?*🤔

 

*बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या व्यवसायाला अधिक सक्षम करा.*😇

 

👉 *खाद्य पदार्थ क्षेत्र* म्हणजे *फूड इंडस्ट्री* मध्ये डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी सध्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

 

👉डिहायड्रेशन पद्धतीचा अवलंब करुन आपण *रेडी टू कूक, रेडी टू इट तसेच पावडर, फ्लेक्स* या प्रकारात शेकडो प्रॉडक्ट्स बनवू शकतो.

 

👉 फळं, भाज्या, हंगामी पिके, मासे इत्यादी वस्तू अनेक कारणांमुळे बऱ्याच अंशी खराब होतात, वाया जातात, त्याचा पूर्ण वापर होत नाही.

 

👉 *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी* वापरुन या सर्व वस्तूंचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल, वर्षभर त्याचा लाभ घेता येईल.

 

👉 सध्या सर्वत्र डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे आणि या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्सची रेंज, आवाका पण खूप मोठा आहे.

 

👉 *सखोल प्रशिक्षण, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे डिहायड्रेशन व्यवसायात चांगली कामगिरी करु शकतो, भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.*

 

👉 *अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने 19-20-21 जानेवारी रोजी *कुडाळ* येथे 3 दिवसीय *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण* आयोजित केलं आहे.

 

👉 हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल वर आधारित असून व्यवसायासाठी लागणारी सर्व माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

 

👉 हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया *DHY* असा व्हॉट्स ॲप मेसेज *8767473919* या क्रमांकावर पाठवावा.

 

👉 हा मेसेज आपल्या ओळखीतल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना व्यवसायासाठी प्रेरित करा, सहकार्य करा.

 

🛑 *टीम अभिनव*

8767473919

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − ten =