अखेर माणगावात ४ जून ते ८ जून जनता कर्फ्यु जाहीर..

अखेर माणगावात ४ जून ते ८ जून जनता कर्फ्यु जाहीर..

माणगाव :

कुडाळ तालुक्यातील माणगाव मध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता ग्रामपंचायतने जनता कर्फ्यू जाहीर केला. ४ जून ते ८ जून असा पाच दिवसाचा हा कडक लॉकडाऊन जारी केला आहे. मेडीकल वगळता सर्व दुकाने बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला. माणगाव ग्रामपंचायत सरपंच जोसेफ डाॅन्टन्स यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत मध्ये महत्वपूर्ण बैठकीत एकमुखाने निर्णय झाला.  यावेळी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भानू जुवेकर व माणगाव मधील व्यापारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा