You are currently viewing आम. वैभव नाईक यांचे कालेली सरपंच सौ. सानीका परब यांनी मानले आभार

आम. वैभव नाईक यांचे कालेली सरपंच सौ. सानीका परब यांनी मानले आभार

कुडाळ :

माणगाव खो-यातील कालेली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ सानिका परब यांची नुकतीच निवड झाल्यावर कुडाळ शिवसेना कार्यालयात आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली असता आम नाईक यांनी अभिनंदन केले. यावेळी सौ परब यांनी आपल्या नविन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी आम नाईक यांनी पाच लाख रुपयांचा निधी तातडीने मंजुर केला. यावेळी सरपंच सौ परब यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी आम नाईक यांनी सांगितले कालेली गावामधे विकास कामांसाठी निधी अजिबात कमी पडणार नसुन आपण आमदार म्हणून सदैव पाठीशी आहे असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, ग्रामपंचायत सदस्या सौ. आरोही चव्हाण, कालेली शिवसेना शाखाप्रमुख श्री. दाजी पडकिल, कालेली शिवसेना पदाधिकारी प्रशांत चव्हाण, संजय गांधी निराधार समीती अध्यक्ष अतुल बंगे, राजु गवंडे, नितीन सावंत, संतोष अडुरकर, शोएब खुल्ली, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, स्वप्नील शिंदे, सुशील चिंदरकर, बंड्या खोत, सतिश कुडाळकर व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =