You are currently viewing शिंदे कुटुंबियांकडून नानेली ग्राम कोविड केअर सेंटरला मास्क, सॅनिटायझर आणि पाणी बॉटल वस्तुरूपाने देणगी

शिंदे कुटुंबियांकडून नानेली ग्राम कोविड केअर सेंटरला मास्क, सॅनिटायझर आणि पाणी बॉटल वस्तुरूपाने देणगी

नानेली :

आज ग्रामपंचायत नानेली येथील कोविड केअर सेंटरला श्री. चंद्रकांत शिंदे आणि माजी सैनिक   श्री. प्रशांत शिंदे यांनी मास्क, सॅनिटायझर आणि पाण्याच्या बॉटल्स वस्तुरूपाने देणगी देण्याचं कौतुकास्पद काम केल. सदर शिंदे कुटुंबीय सध्या माणगाव येथे गेली पंधरा वर्षे वास्तव्यास असले तरी आपल्या गावाचं आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून आपल्या गावातील लोकांना मदतीचा हात पुढे केला.या दातृत्वाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. यावेळी गावचे सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी, ग्रामपंचायत सदस्य श्री. सिद्धेश धुरी, विनायक मेस्त्री, ग्रामसेविका चेतना म्हाडगूत, पोलीस श्री. फोंडेकर सर आणि सोन्सूरकर सर,पोलीस पाटील श्री. संजय धुरी,संगणक ऑपरेटर वीणा धुरी, कोविड योद्धा विशाल धुरी, रुपेश नार्वेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा