You are currently viewing ‘..कश्मिर की धरती रानी है.. सरताज हिमालय है! हम सब भारतीय है..!’

‘..कश्मिर की धरती रानी है.. सरताज हिमालय है! हम सब भारतीय है..!’

..कश्मिर की धरती रानी है.. सरताज हिमालय है! हम सब भारतीय है..!’

58 महाराष्ट्र बटालीयन एनसीसी चे 21 जुलैपर्यंत शिबीर; शारीरिक क्षमतेबरोबर एकात्मतेचे धडे

 सिंधुदुर्गनगरी

‘कश्मिर की धरती रानी है..सरताज हिमालय है!.. हम सब भारतीय है.. हम सब भारतीय है..’ 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सीएटीसी (CATC)  व भारतीय थल सेना शिबीरात छात्रांना शारीरिक, मानसिक क्षमतेबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचे धडे मिळत आहेत. 21 जुलैपर्यंत चालणाऱ्या या शिबीरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर जिल्ह्यातील 290 ज्युनियर व सीनियर  कॅडेट्स नी  सहभाग घेतलेला आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा क्रीडा संकुलात कमांडींग ऑफिसर कर्नल दीपक कुमार दयाळ सेना मेडल प्राप्त, ॲडम ऑफिसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार मेजर देवेंद्र सिंह, सुभेदार मेजर तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्र केस, सुभेदार जितेंद्र तिवारी, सुभेदार आर एन भांजा, यांच्या अधिनस्त हे शिबीर सुरू आहे. तसेच एनसीसी असोसिएट ऑफिसर अधिकारी लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत  सिंधुदुर्ग कॉलेज मालवण, द्वितीय अधिकारी आनंदा बामणीकर, तृतीय अधिकारी रविराज प्रधान एस. एम. हायस्कूल कणकवली, सागर गुरव माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या सर्वांचाही यात सहभाग आहे. फायरिंग, ऑब्स्टॅकल आणि संचलन प्रशिक्षणावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस उपस्थित होत्या.

या शिबीरात रायफल प्रशिक्षण, नेमबाजी, नकाशा वाचन, संचलन, अडथळ्यांची शर्यत पार करणे, शारीरिक क्षमता, बौ‍ध्दिक विकास, हॉलिबॉल,  खो. खो, संस्कृतिक कार्यक्रम आदिचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

त्याचबरोबर सामाजिक भान, समाजसेवा, आपती व्यवस्थापन यासंबंधीसुद्धा मार्गदर्शन केले जात आहे. या बटालियन अंतर्गत वेगवेगळ्या गटाच्या स्पर्धा देखील या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आर्मी चे अनेक अधिकारी हे प्रशिक्षण देत आहेत.

            कमांडींग ऑफिसर कर्नल दीपक कुमार दयाळ- ऑल इंडिया थल कॅम्पच्या निवडीसाठी हा कॅम्प होत आहे. आर्मीमधील प्रशिक्षणाचा या शिबीरात समावेश असल्याने इतर विद्यार्थ्यांपेक्षा एनसीसीचे विद्यार्थी निश्चितच एक पाऊल पुढे असणार आहेत. त्याचा फायदा त्यांना त्यांच्या आयुष्यात तसेच करीअरच्या दृष्टीनेही होणार आहे. अग्निवीर भरतीसाठी छात्रांना या प्रशिक्षणाचा चांगलाच फायदा होणार आहे.

 सुभेदार मेजर दिनेश गेडाम- भारतीय तीनही सैन्य दलात भरती होण्यासाठी या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे.त्याच बरोबर व्यक्तीमत्व विकासासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देश सेवा, राष्ट्रीय एकात्मता वाढण्यासाठी हे शिबीर महत्वाचे ठरते.

सिनीयर अंडर ऑफिसर स्वप्नील पाटील – ए, बी, सी प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे. या परीक्षेमध्ये किमान बी ग्रेड मिळाल्यास  सैन्यात अधिकारी पदासाठी भरती होणे सोपे होणार आहे.

ज्युनीयर अंडर ऑफिसर भूषण पवार- थल सेना कॅम्पसाठी सराव सुरु असून येथून दिल्लीसाठी निवड होणार आहे.

बिखरे बिखरे तारे हैं हम लेकीन झीलमील एक हैं.. हम सब भारतीय है..‘ हे एनसीसी गीत ‘एकता और अनुशासन’ या एनसीसीच्या  उद्देशाबरोबरच  देश प्रेम, राष्ट्रीय एकात्मता निश्चितच  वाढीस लावते.

प्रतिक्रिया व्यक्त करा