You are currently viewing परि स्वार्थ तुझ ते वाटले

परि स्वार्थ तुझ ते वाटले

नकळत काही मी बोलले
ते का नाही तूझ समजले
स्वार्थ नाही मी साधले
परि स्वार्थ तुझ ते वाटले

हित त्यात तुझेच असले
का नाही तुझ समजले
कष्टाविना जीवन हे
व्यर्थच नाही का जाहले

असे माझे ते बोलणे
मनाशी तू का लाविले
असे माझे ते वागणे
परि स्वार्थ तुझ ते वाटले

धरलास तू अबोला जरी
राग नाही वाटेल रे
असे माझे ते वागणे
परि स्वार्थ तुझ ते वाटले

श्रीमंत जरी नसलास तू
हात नाही सोडणार रे
कष्ट करायची ताकद ठेव
साथ तुझी देईन रे

असे माझे ते बोलणे
का नाही तूझ समजले
स्वार्थ नाही मी साधले
परि स्वार्थ तुझ ते वाटले

(सुकन्या नाईक)

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =