You are currently viewing गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर, लिखित अप्रतिम लावणी रचना*

*गुलाबी थंडी*
*लावणी*

गोड गुलाबी थंडीने, शहारली माझी काया
तुम्ही शाल पांघरा, उबदार मिठीची राया ॥ धृ.॥

गोऱ्या गोबऱ्या गालाची ही नाजूकशी खळी
तिनेच घेतला की ओ, धनी तुमचा ह्यो बळी
मनाच्या पडद्यावरती, पडली तुमची छाया
तुम्ही शाल पांघरा, उबदार मिठीची राया ॥ १ ॥

पंखुडीत पापण्यांच्या , प्रीत माझी लपली
लज्जेने चूर झाले, आता रात्रही संपली
हृदयाच्या कप्यामध्ये , जपते तुमची माया
तुम्ही शाल पांघरा, उबदार मिठीची राया ॥ २ ॥

तीर तुमच्या नजरेचा , काळजात घुसला
उगवत्या रविवर का ,तुम्ही बरे रुसला
रुसवा सोडा जवळ घ्याना, वेळ जातो वाया
तुम्ही शाल पांघरा उबदार मिठीची राया ॥ ३ ॥

*✒️© सौ. आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =