You are currently viewing अवैध धंद्यांना पोलिसांचा पाठिंबा?; निलेश राणेंचा गंभीर आरोप
Oplus_16908288

अवैध धंद्यांना पोलिसांचा पाठिंबा?; निलेश राणेंचा गंभीर आरोप

दोन दिवसांत विशेष पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे करणार; सिंधुदुर्गात खळबळ

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरून शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर व्यवसायांना जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांच्याकडून पाठिंबा मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी येत्या दोन दिवसांत विशेष पत्रकार परिषद घेणार असल्याचे आमदार राणे यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.

निलेश राणे यांच्या या थेट आरोपांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय आणि पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पत्रकार परिषदेत ते नेमके कोणते खुलासे करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा