You are currently viewing संघठण ही सेवा, सेवा सप्ताह नियोजन बैठक

संघठण ही सेवा, सेवा सप्ताह नियोजन बैठक

कुडाळ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. संपूर्ण देशभर 14 सप्टेंबर 2020 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधी मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. या सेवा सप्ताहा मध्ये किसान मोर्चा म्हणून प्रत्येक मंडलनिहाय वृक्षारोपण व वृक्ष वाटप हा कार्यक्रम घ्यावा अशी सूचना जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिलेल्या आहेत.

त्या संदर्भात नियोजनाची बैठक सोमवार दिनांक14/09/2020 रोजी सकाळी 10.30 वाजता कुडाळ मराठा समाज हाॅल – तळमजला येथे आयोजित केलेली आहे. तसेच ही बैठक संपल्यावर किसान मोर्चा, सिंधुदुर्ग च्या वतीने सेवा सप्ताहाचा शुभारंभ वृक्षारोपण करुन होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व किसान मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील मराठा समाज हाॅल – तळमजला येथे उपस्थित रहावे .

सदर बैठकीस जिल्हा सरचिटणीस व सेवा सप्ताह जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई मार्गदर्शन करणार आहेत. तरी या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्षांनी व किसान मोर्चा पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन किसान मोर्चा, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत व जिल्हा सरचिटणीस उमेश सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − fifteen =