You are currently viewing पेंडुर येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 100%

पेंडुर येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 100%

मालवण :

मालवण तालुक्यातील पेंडुर येथील न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर चा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यावर्षी शाळेतून 29 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्व विद्याथी उतीर्न झाले. यात प्रथम क्रमांक कु. भक्ती विठोजी पाटील 94.80 व कु. प्राजक्ता शिवराम नातू 94.80 द्वितीय क्रमांक कु. श्रुती रामदास पेडणेकर 91.80 तर तृतीय क्रमांक कु. प्राची संभाजी परब 91.20 गुण मिळवून यश संपादन केले. यातील कु. प्राची परब हिने प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षकांच्या मार्गद्शनाखाली व कोणतीही क्लास न लावता घरी अभ्यास करून तिसऱ्या क्रमांकाचे यश मिळवले आहे. त्याबाबत तिचे कौतुक होत आहे. या सर्व विद्यार्थांचे शाळेचे संस्थाध्यक्ष बाबुराव राणे, घन श्याम राणे, मुख्याध्यापक सुरेश तावडे यांनी व शाळेचे इतर पदाधिकारी शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा