You are currently viewing अन्यथा लसीकरण केंद्र बंद पाडू – जयेंद्र रावराणे यांचा इशारा

अन्यथा लसीकरण केंद्र बंद पाडू – जयेंद्र रावराणे यांचा इशारा

केंद्रावर परजिल्ह्यातील नागरिकांची गर्दी नको : वैभववाडीवासियांना प्राधान्य द्या

वैभववाडी
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 18 ते 44 वयोगटातील नागरीकांसाठी तालुक्यात एकमेव लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु या केंद्रावर परजिल्ह्यातील नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिक लसीकरणापासून वंचित रहाणार आहेत. या केंद्रावर तालुकावासियांना प्राधान्य न दिल्यास लसीकरण केंद्र बंद पाडणार असल्याचा इशारा माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिला आहे.

18 ते 44 वयोगटासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्यात येत आहे. दि 4 मे पासून या केंद्रावर लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. दि.4 रोजी या केंद्रावर 100 जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये तालुक्यातील केवळ 9 ते 10 जणांचा समावेश आहे. त्याचबरोबर दि. 6 रोजी या केंद्रावर 200 जणांना लस देण्यात आली. त्यात वैभववाडीतील केवळ 35 ते 40 नागरिकांचा समावेश आहे. असे पत्रकात जयेंद्र रावराणे यांनी म्हटले आहे.

लसीकरणाच्या आँनलाईन नोंदणीला विरोध असण्याचे कारण नाही. परंतु साईटमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.
या केंद्रावर पुणे, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक लसीकरण करण्यासाठी गर्दी करत आहेत. या प्रकारामुळे तालुक्यातील नागरिक लसीपासून वंचित राहील्यास जबाबदार कोण? त्याचबरोबर कोरोना महामारीत रुग्ण दगावल्यास जबाबदार कोण? असे पत्रकात श्री. रावराणे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा