You are currently viewing स्वाती काळे/झेंडे यांचा अंतरीची अक्षरलेणी काव्यसंग्रह साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित

स्वाती काळे/झेंडे यांचा अंतरीची अक्षरलेणी काव्यसंग्रह साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळातर्फे सालाबादप्रमाणे या ही वर्षी सन 2021-22 मध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..
यामध्ये श्रीगोंदा येथील प्राथमिक शिक्षिका,लेखिका व कवयित्री असलेल्या स्वाती काळे/झेंडे यांच्या अंतरीची अक्षरलेणी या काव्यसंग्रहाची निवड झाली . दिनांक 10 एप्रिल रोजी सातारा येथे पार पडलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या भव्य व सुंदर अशा साहित्यिक सोहळ्यात त्यांना साहित्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी साहित्य ,कला व मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा