You are currently viewing बांदा येथे राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा संपन्न

बांदा येथे राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा संपन्न

*बांदा येथे राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा संपन्न*

*बांदा*

शालेय वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीची मराठी,सेमी व इंग्रजी या माध्यमाची राज्य स्तरीय गुरुकुल प्रज्ञा परीक्षा बांदा नं.१केंद्रशाळेत सुरळीत पार पडली.
बांदा नं.१ केंद्रशाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत या परीक्षेचे उद्घाटन करण्यात आले.या परीक्षेत पहिली व दुसरी साठी भाषा गणित व परिसर अभ्यासाचा एक पेपर व तिसरी व सातवी साठी भाषा व गणित तसेच इंग्रजी व बुद्धीमत्ता असे पेपर पार पडले.या परीक्षेला बांदा परिसरातील १००हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते .स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.परीक्षा सुरळीत पार पाडल्याबद्दल गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किरण चौगुले व शिक्षक श्री जे.डी पाटील यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =