“मी घरची धुणी रस्त्यावर धुत नाही” देवेंद्र फडणवीस.

“मी घरची धुणी रस्त्यावर धुत नाही” देवेंद्र फडणवीस.

मुंबई प्रतिनिधी

मराठा आरक्षण, कंगना राणावत आणि एकनाथ खडसे यान बद्दल भाष्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी केले आहे. मराठा आरक्षण विषयी आलेला निर्णय हा धक्कादायक आहे. आरक्षण प्रकरणात सरकार कमी पडलं. सरकार मुद्दे मांडण्यात कमी पडले आणि
आरक्षण हा राजकारणाचा मुद्दा नाही तर
कोर्टाने दिलेल्या निर्णयावर सरकारने बोध घ्यावा असे फडणवीस म्हणाले.
कंगना आणि शिवसेना यांच्यात वाद वाढतच आहे हे पाहता फडणवीस म्हणाले की कोरोना ऐवजी कंगनाशी लढाई सुरू आहे. कंगना सोडून कोरोनाला गांभीर्य द्या अशी टीका फडणवीसांनी राज्य सरकार वर केली.
भाजप नेते खडसे यांनी फडणवीसांवर टोलेबाजी केली होती. फडणवीस म्हणाले खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या तक्रारी दूर करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनाम द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा