You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला दिले दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर

आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला दिले दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर

ऑक्सिजनच्या तुटवड्यांतर आमदार राणे यांचे दिसले पुन्हा दातृत्व

मध्यरात्री संपला होता ऑक्सिजन

नातेवाईकांनी व्यक्त केले आभार

कणकवली

आमदार नितेश राणे यांनी कोरोना काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेला आरोग्य सुविधा पुरविल्या हे सर्वज्ञात आहे. मात्र जेव्हा एखाद्या रुग्णाचे प्राण कंठाशी आलेले आहेत असे कळताच मध्यरात्री ऑक्सिजन पुरवठा करून त्या रुग्णाला जीवदान देण्याचे कार्य ते करतात हे विशेष. कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी वेळ काळ महत्वाचा नसतो, मदत करतांना माणूस पाहून राणे कुटुंब मदत करत नाहीत तर आलेला वाईट प्रसंग कोणाच्या जीवावर बेतू नये यासाठी धावून जाऊन मदत करतात.याची अनुभूती आज कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मधील ऑक्सिजन संपले तेव्हा आमदार नितेश राणे यांच्या दातृत्वाची प्रचिती आली.

पडवे येथून दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर देऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची काळजी घेतली. ऑक्सिजन नाही म्हणून प्राण कंठाशी येण्याचे प्रकार कोरोना काळात दिवसागणिक घडत असतात. आजपर्यंत अनेकांना या कोरोना मुळे प्राण गमवावे लागले आहेत. मात्र आपल्या मतदार संघातील रुग्णाला आरोग्य व्यवस्था अपुरी पडली आणि प्राण गेले अशी घटना घडू नये यासाठी आमदार नितेश राणे नेहमी तत्प असतात.२ मे रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात असाच ऑक्सिजन चा तुटवडा भासू लागला.कोविड रुग्णाचा ऑक्सिजन संपला म्हणून उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थेटर मधील ऑक्सिजन वापरले मात्र तेही संपले ही घटना कळताच आमदार नितेश राणे यांनी दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपजिल्हा रुग्णालयाला पाठवून दिले आणि त्या रुग्णांचे प्राण वाचले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन चा तुटवडा झाला तेव्हा जिल्ह्यातील मुख्य ऑक्सिजन गोडावून मधून ऑक्सिजन सिलेंडर येण्यास सकाळ उजाडणार होती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवकांचे जीव टांगणीला लागले होते. यातील दोन रुग्णाच्या नातेवाईकांनी भाजपा आमदार नितेश राणे यांना फोन केला. उपजिल्हा रुग्णालयात आपला नातेवाईक ऑक्सिजन साठी तडफडत असल्याचे त्यांनी सांगितले. क्षणाचाही विलंब न करता आपल्या पडवे येथील व्हॉस्पिट मधून दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर रात्रीच उपजिल्हा रुग्णालयात पाठवून देत कोरोना सेंटर मध्ये ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविले.

आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी जम्बो ऑक्सिजन सिलेंडर वाटपाचा निर्णय घेऊन काही सिलेंडर जिल्हात आणले आहेत. त्याचे वाटप जिल्ह्यातील रुग्णालयात केले जाणार आहे. त्यापूर्वीच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ही आपत्ती ओढवली तेव्हा प्रशासनाचे सोपस्कार नकरता थेट रुग्णालयाला ऑक्सिजन देऊन प्राण वाचविण्याला प्राधान्य दिले.आमदार नितेश राणे यांच्या पालकत्वाची प्रचिती कोरोना काळात गेल्या दोन वर्षे पावलो पावली आली आहे. आज तर मध्यरात्री रुग्णाचा ऑक्सिजन संपल्यावर नातेवाईकांचे सर्वच पर्याय संपले तेव्हा हक्काचा आमदार म्हणून हा हक्काचा पर्याय उपयोगी आला आणि दोन्ही रुग्णांचे प्राण वाचले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − six =