जे.जे. रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात

जे.जे. रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात

पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.

मुंबई

भारत बायोटेक या कंपनीने बनविलेल्या ‘कोव्हॅक्सीन’ या कोरोनावरील लसीच्या लसीकरणाला मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे. जे . रुग्णालयात सुरुवात करण्यात आली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे.सदर लसीचे २ डोस ४ आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.

राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लशीचे २०,००० डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात २८५०० लस देण्याचे नियोजन आहे.

भारत बायोटेककडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील ६ ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालये व २ जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार श्री. अमिन पटेल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर आदी जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता रणजीत मानकेश्वर, डाॅ. तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा