You are currently viewing तृतीयपंथी समाजासाठी  14 जूलै रोजी कार्यशाळा

तृतीयपंथी समाजासाठी  14 जूलै रोजी कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथीय व्यक्तींच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  गुरुवार दि. 14 जूलै 2022 रोजी  दुपारी 3 वाजता  जिल्हा नियोजन जुने सभागृह सिंधुदुर्ग येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली,असल्याची माहिती जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली.

            सामाजिक न्याय  व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथी व्यक्तीसाठी National Portal For Transgender persons  राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज  करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुषंगाने 1) तृतीयपंथीय व्यक्तीचे नवीन ओळखपत्र व प्रमाणपत्र नोंदणी. 2) नोंदणी झालेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना  ओळखपत्र व  प्रमाणपत्र वाटप 3) तृतीयपंथीसाठी आरोग्य तपासणी शिबीर .4) तृतीयपंथीय व्यक्तींना कायदेविषक सल्ला व मार्गदर्शन 5) तृतीयपंथीयांना शिधा पत्रिका मिळण्यासाठी मार्गदर्शन, मदत करणे.6) तृतीयपंथीयांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन मिळण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे  आयेजित करण्यात आले आहे.

            या कार्यशाळेला तृतीयपंथी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थेनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवून लाभार्थ्यांनी उपस्थित राहून नोंदणी करुन घ्यावी, तसेच कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. साळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 2 =