You are currently viewing मळेवाड रस्त्यातील खड्डयात वृक्षारोपण

मळेवाड रस्त्यातील खड्डयात वृक्षारोपण

चतुर्थीपूर्वी खड्डे न बुजविल्यास आंदोलन

सावंतवाडी

मळेवाड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्ष रोपण करण्यात आले असून लवकरच आंदोलन छेडण्यात येणार आहे. सावंतवाडी मळेवाड शिरोडा, आरोंदा, सातार्डा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.सावंतवाडी मळेवाड मार्गाचे डांबरीकरणाचे काम मंजूर होऊन दोन वर्ष उलटून गेली आहेत.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींची निष्क्रियता यामुळे हे डांबरीकरण रखडलेले आहे.

या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेले गटार पूर्णपणे बऱ्याच ठिकाणी भुजवले गेल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून रस्ता उघडतो. यामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे बुजवणे गरजेचे होते.मात्र तसे न करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. यामुळे मळेवाड हेदुलवाडी येथे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आता तरी जाग येईल का असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. या रस्त्याबाबत वेळोवेळी निवेदन व मागणी करु नये खड्डे बुजवण्यात आलेले नसल्याने लवकरच जनआंदोलन छेडण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा