कारीवडेत महिलेची चिरेखाणीत आत्महत्या

कारीवडेत महिलेची चिरेखाणीत आत्महत्या

सावंतवाडी

कारिवडे पेडवेवाडी माळकरवाडी येथील चिरेखाण येथील पाण्यात एका ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला असून तिने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मी जयवंत माने असे तिचे नाव असून रविवारी दुपारपासून ती बेपत्ता होती. तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक स्वाति यादव यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल ड्युमिंग डिसोजा, राजेश गवस, प्रणाली रासम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दगड खाणीतील पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला असून तो बाहेर काढला जाणार आहे. याबाबतची खबर कारीवडे पोलीस पाटील प्रदीप केळुसकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा