You are currently viewing १२ नोव्हेंबर रोजी कोलगाव कलेश्वर जत्रोत्सव

१२ नोव्हेंबर रोजी कोलगाव कलेश्वर जत्रोत्सव

ओटवणे

कोलगावचे ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार १२ नोव्हेंबरला होत आहे .यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कलेश्वरला भरजरी वस्त्र व सुवर्णालंकारांनी सजविण्यात येणार आहे. सकाळी कुळ घराकडून सवाद्य तरंगकाठीसह पालखी निघणार आहे. रात्री ११ वाजता सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर मध्यरात्री एक वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे.

भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष बाबा राऊळ,सचिव एल. एम. सावंत आणि देवस्थानांच्या मानकऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 12 =